आमच्याबद्दल
सस्नेह नमस्कार,
आपल्या संस्थेने ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाने जोडले आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार झालेला आहे, या तंत्रज्ञानाचे आधारे ग्राहकांना सेवा देण्याचा आपला मानस आहे, त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल सुरू आहे.
संस्थेने या वाटचालीत नवनवीन उपक्रम राबविली आहेत, ध्येय धोरणे निश्चित केली आहेत, ती पूर्ण करण्याचा सचोटीने प्रयत्नही केला आहे, यामुळे संस्थेने सभासदांच्या व ग्राहकांच्या मनामध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे, ग्राहकांना तत्पर व बिनचूक सेवा देणे, त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे , तंत्रज्ञान शिकविणे, ग्राहकांना आकर्षित करणे , व्यवसाय वाढविणे, पर्यायाने नफा क्षमता वाढविणे, उत्कृष्ट व्यवस्थापन ई.मुळे संस्थेचा नाव लौकिक वाढला आहे.
संस्थेचे कुटुंब प्रमुख मा. मिनि यार साहेब, संचालक मंडळ व सेवक वर्ग यांनी आपल्या बुद्धी कौशल्यातून सभासदांच्या हितासाठी अनेक योजना साकारल्या आहेत, त्यासाठी अविरत परिश्रम घेतले आहेत, सभासदांचा विश्वास संपादित केला आहे, आणि म्हणूनच संस्थेची जनमानसात उत्तुंग प्रतिमा निर्माण झाली आहे, सभासदांनी व ग्राहकांनी संस्थेस अनमोल सहकार्य व मार्गदर्शनामुळे संस्थेची घोडदौड सुरू आहे.
उल्लेखनीय कामगिरी
भागभांडवल व सभासद :
अहवाल वर्षात संस्थेचे भागभांडवल गतवर्षापेक्षा रू. ९७.५८ लाखाने वाहून रू. १७.७० कोटी इतके झाले. सभासद संख्येमध्ये १०४६ सभासदांची वाढ होऊन, राजीनामे वजा जाता सभासद संख्या २२३३० इतकी झाली. या नियमित सभासदांव्यतिरिक्त अहवाल सालातील नाममात्र सभासदांची संख्या ३७४३ इतकी आहे.
स्वनिधी :-
भागभांडवल, राखीव निधी व इमारत निधी मिळून असलेल्या स्वनिधीची रक्कम ४५.८७ कोटी इतकी झाली आहे.स्वनिधी संस्थेच्या आर्थिक क्षमतेचा मापदंड असुन यातील एकसमान व सुसंबध्द वाढ संस्थेची दमदार आणि सुदृढ आर्थिक स्थिती दर्शविते.
ठेवी:
अहवाल वर्षामध्ये संस्थेच्या ठेवी रू. १८.५९ कोटीने वाढून रू. ३८१ कोटी ९८ लाख इतक्या झाल्या आहेत.
कर्जेः
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बँकिंग क्षेत्रात कर्जातील वाढ ही खूपच मंदावलेली होती. या मंदावलेल्या कर्ज वृद्धीच्या पार्श्वभूमीवर संस्थेची या क्षेत्रातील कामगिरी समाधानकारक आहे. अहवाल वर्षामध्ये संस्थेची एकूण कर्जे रू. २६८ कोटी ५० लाख इतकी झाली आहेत.
सांपत्तिक स्थिती
| अ. न. | तपशील | 2020-21 | 2021-22 |
| 1 | सभासद संख्या (Number of Members) | 21284 | 22330 |
| 2 | वसूल भागभांडवल (Paid up Share Capital) | 16,72,37,625 | 17,69,96,350 |
| 3 | राखीव निधी (Reserve Funds) | 16,17,58,211 | 17,96,04,808 |
| 4 | इतर निधी (Other Funds) | 61,57,72,943 | 66,41,81,877 |
| 5 | ठेवी (Deposits) | 363,38,54,694 | 381,97,54,667 |
| 6 | कर्जे (Loans & Advances ) | 266,10,84,970 | 268,49,56,668 |
| 7 | गुंतवणूक ( Investments ) | 201,49,29,739 | 217,56,47,299 |
| 8 | थकबाकी मुदत संपलेली | 23,58,03,255 | 32,32,78,735 |
| 9 | थकबाकी शे. प्रमाण (Outstanding ) | 8.87% | 12.04% |
| 10 | निव्वळ NPA प्रमाणपत्र (Net NPA Certificate) | 0.47% | 4.69% |
| 11 | निव्वळ नफा (Net Profit ) | 6,27,28,662 | 5,21,71,326 |
| 12 | खेळते भांडवल (Working Capital ) | 482,11,11,746 | 504,47,94,415 |
| 13 | ऑडिट वर्ग (Audit Class ) | ‘अ’ | ‘अ’ |
| 14 | शाखा (मुख्यालयासह) | 28 | 28 |
| 15 | लाभांश (Dividend) | 10 | 10 |